Chikhaldara Hill Station

Chikhaldara Hill Station : 3 Days Travelogue by Vaibhav Lokhande

Chikhaldara Hill Station

‘मेळघाट’ आणि ‘चिखलदरा’ बद्दल आतापर्यंत शाळेत पुस्तकामध्ये फक्त वाचले होते पण प्रत्यक्षात पाहण्याचा योग मात्र आमच्या छोटेखानी मेळघाट फॅमिली ट्रिप दरम्यान आला. जंगल महर्षी श्री मारुती चिंतमपल्ली ह्यांच्या “केशराचा पाऊस” ह्या पुस्तकामध्ये मेळघाट च्या सौंदर्याचे जे वर्णन केले आहे अगदी तसाच सुंदर आहे “मेळघाट”..!! विदर्भातील एक हटके हिल स्टेशन.. चिखलदरा..!!

I had only read about ‘Melghat’ and ‘Chikhaldara Hill Station’ in school books, but I finally got to see them during our small family trip to Melghat. The beauty of Melghat described in the book “Kesharacha Paus” by the forest sage Shri Maruti Chintampalli is just as beautiful in real life. Melghat is a unique hill station in Vidarbha, and Chikhaldara is equally charming!

सभोवर सागवान ची उंचच उंच जंगले.. ओसंडून वाहणारी काचे सारखी शुभ्र पाण्याची सिपना नदी, फेसळणारे धबधबे, पक्षांचा किलबिळाट, बहरलेली रान फुले, सुंदर धुके, निळे आकाश, हिरवा आणि फुलांचा साज घालून सजलेले डोंगर आणि पठार, त्यातून जाणारे नागमोडी सुंदर रस्ते आणि खूप काही. चिखलदऱ्या चे वर्णन असेच काही..

अमरावती मधील चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील सातपुडा पर्वत रांगेमध्ये वसलेला डोंगराळ भाग ‘मेळघाट’ नावाने ओळखला जात असून याच ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे. ह्या पर्वत रागांना गाविलगड पर्वत रांग असेही संबोधतात. वैराट हे सर्वोच शिखर समुद्र सपाटीपासून ११७८ मीटर उंच आहे. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार ह्या पाच नद्या वाहतात आणि पुढे त्या तापी नदीला मिळतात. घनदाट जंगलात माखला, चिखलदरा, चीलादारी, पातुल्डा आणि गुगमाळ ही अतिशय दुर्गम ठिकाणे आहेत. मेळघाट हा प्रदेश १९७४ साली राखीव व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाला.

Day 1 : Amzari | Adventure Activities | Jatradoh Waterfall | Chikhaldara Points | Gavilgad Fort

दोन दिवसांच्या मुक्कामामध्ये मध्ये आमचा पहिला मुक्काम होता तो, फ़ॉरेस्ट डिपार्टमेंट च्या निसर्ग पर्यटक संकुल ‘आमझरी’ येथे. जंगलांनी वेढलेले हे गेस्ट हाऊस. इथले कॉटेज, लोकल जेवण खूप छान होते. इथे राहण्यासाठी आम्हीच होतो बाकी कोणीही नव्हते त्यामुळे एक सुखदाई शांतता अनुभवता आली. इथे घेतलेला, झिप लाईन, रिव्हर क्रॉसिंग, बंजी जंपिंग, वॉल क्लायम्बिंग चा अनुभव आमच्या कायम लक्षात राहील. येथील जत्रा डोह धबधबा पाहून मन थक्क होतं.. येथून पुढचा पाडाव होता निसर्ग संपन्न चिखलदरा आणि गाविलगड येथे.

Amzari

चिखलदरा विषयी सांगायचे तर, महाभारताच्या प्राचीन, पौराणिक महाकाव्यात वर्णन केल्याप्रमाणे, पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदऱ्यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झऱ्यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते.

Bhimkund

जवळजवळ एक हजार वर्षे विस्मृतीत घालवलेल्या चिखलदरा शहराचा शोध १८२३ साली हैदराबाद रेजिमेंटमध्ये कार्यरत ब्रिटीश सैनिक कॅप्टन रॉबिन्सन याने पुन्हा शोधून काढला. पुन्हा एकदा शोध लागल्यावर, हिरव्यागार टेकड्यांमुळे चिखलदरा हिल स्टेशन इंग्रजांसाठी एक झटपट हिट बनले, त्यांना आठवण करून दिली ती त्यांच्या जन्मभूमीची; विशेषतः शरद ऋतूतील..!!

चिखलदरा येथील हजारो फूट खोल दऱ्या या पर्यटकांचा काही काळ श्वास रोखण्यास कारणीभूत ठरतात. दरीच्या वरच्या भागात एक कुंड आहे. या कुंडात भीमाने आंघोळ केली होती, त्यामुळे या कुंडाला भीमकुंड असे नाव पडले आहे असे म्हणतात. खोल दरी आणि तिच्या मधून धो धो कोसळणारा शुभ्र धबधबा.. हा पॉईंट खरंच आपल्याला एकदम मंत्र मुग्ध करून जातो.

चिखलदरा येथे विविध पॉइंट पर्यटकांचे स्वागत करत असतात. दरीच्या पायथ्याशी काही पायऱ्या उतरुन गेले असता देवी पॉइंट आहे. डोंगराच्या एका भुयारात देवी वसलेली आहे. तेथून चंद्रभागा नदीचा उगम आहे. देवीच्या समोर एक कुंड आहे. कुंडातून पाणी सरळ दरीत उडी घेते. देवीचे दर्शन झाल्यानंतर फेसाळलेला धबधबा मनमोहून टाकतो. देवी पॉइंटहून जवळच मोझरी पॉइंट असून त्याच्या बाजूला हरिकेत पॉइंटही आहे. वनोघाटात संध्याकाळी कुटुंबियांसोबत फिरायला मज्जा आली. लहान मुलांसाठी गार्डन रेल्वेचीही सोय येथे करण्यात आली आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे कॉफी. येथे कॉफीचे उत्पादन घेतले जाते.

Devi Point Chikhaldara

चिखलदऱ्याच्या दक्षिणेला तीन किलोमीटरवर गाविलगड किल्ला आहे. किल्ला पाहण्यासाठी एक संपूर्ण दिवस लागतो. पण वेळेअभावी आम्ही आठ किलोमीटर ची चार तासांची पायपीट करून आम्ही किल्ल्याचे मुख्य अवशेष अनुभवले. आत जुन्या इमारतींचे अवशेष, तोफा वगैरे आहेत. इथली दुहेरी तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. याशिवाय इथले शक्कर तलाव, देवी तलाव, मछली तलाव, काला पाणी तलाव आणि मंकी पॉइंट अशी काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

पंचबोल पॉइंट (इको पॉइंट) तर पर्यटकांना चक्राऊन टाकणार आहे. चारही डोंगरानी वेढलेली ही खोल दरी आहे. येथे मोठ्याने आवाज केल्यास पाच वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो. विराट देवी हा इथला प्रसिद्ध पॉइंट. चिखलदऱ्यापासून 11 किलोमिटर दूर डोंगरावर विराट देवीचे मंदिर बांधलेले आहे. खरे देवीचे मंदिर पश्चिमेकडील खोल दरीत एका भुयारात आहे. तेथे जाणे अशक्य असल्याने नवे मंदिर बांधण्यात आले आहे.

ह्या शिवाय, प्रॉस्पेट पॉईंट, बेलाव्हिस्टा पॉईंट, बेलेन्टाईन पॉईंट, मंकी पॉईंट, लॉग पॉईंट, लेन पॉईंट, वैराट पॉईंट, हरिकेन पॉईंट हे सुद्धा खूप सुंदर आहेत.

चिखलदरा चे सुंदर दृश्य मनात साठवून आम्ही पुढे दुसऱ्या दिवसाच्या मुक्कामासाठी सिमा डोह च्या इको टुरिजम कॉम्प्लेक्स आलो. सिपना नदी काठी वसलेला हा परिसर खरंच खूपच सुंदर आहे. स्वप्नवत.. सिपना चा अर्थ होतो ‘सागवान’. कचेसारखे नितळ पाणी.. अगदी तळ दिसावा इतका.. नदीच्या दोन्ही बाजूला असलेली उंचच उंच सागवान तसेल इतर जंगली झाडें, सिपना नदीच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतात. ह्या ठिकाणी बसून जणू काश्मीर लडाख ची आठवण येते.. किती तरी वेळ नदी किनारी हे सौंदर्य पाहत बसलो.. नदीत डुंबलो.. पण मन भरत नव्हते. असं वाटत होतं कि येथून जाऊच नये. पूढे कधी संधी मिळाली तर दोन दिवस फक्त सिपना नदी किनारी घालवावे असेच वाटून जाते. येथून पाच किलोमीटर अंतरावर सिमा डोह धबधबा आपल्याला खुणावतो. त्याचे ते रौद्र पण तितकेच सुंदर रूप मन मोहित करते.

Day 2 : Semadoh | Sipna River | Kolkas | Elephant Jungle Safari |
semadoh
semadoh a type guest house
sipna river semadoh guest house
semadoh guest rest house sipna river bridge

सिमा डोह पासून जवळच फ़ॉरेस्ट डिपार्टमेंट चे ‘कोलकाज’ नावाचे जंगलात लपलेले एक सुंदर पर्यटन संकुल आहे. येथेही राहण्याची सोय होते. ह्याचे वैशिष्ट म्हणजे येथील वन विश्राम गृह जेथे मा. इंदिरा गांधी सुद्धा राहिल्या होत्या. येथून वाहणाऱ्या नागमोडी नदीचे आणि सभोंवर पसरलेल्या कुवार जंगलाचे सुंदर दर्शन होते. कोलकाज चे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, येथील हत्ती जंगल सफारी. पण काही कारणास्तव आम्हाला ही नाही करता आली.

kolkas
Day 3 : Kukru Khamla | Windmills | British Coffee Garden | Heritage Guest House | Achalpur Fort | Hauz Katora | Ambadevi Mandir

सिमा डोह आणि सिपना नदीचे सौंदर्य मानत साठवून आम्ही तिसऱ्या दिवशी निघालो ते मध्य प्रदेश मध्ये येणाऱ्या ‘कोकरू – खामला’ ह्या मिनी हिल स्टेशन येथे. नागमोडी रस्ता, वाटेल दिसणारे धबधबे, रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेली सागवान ची उंच झाडी, हिरवा गार गालिचा, त्यावर उमललेली सुंदर रंगीबेरंगी रान फुले, कोवलं ऊन आणि थंड आल्हादायक हवा. कुकरू – खामला चे वातावरण असेच काही. येथे आमच्या शिवाय खूप कमी पर्यटक होते त्यामुळे निसर्गाचा आस्वाद मना प्रमाणे घेता आला. कुकरू येथील दुधाची रबडी आणि खवा ची चव अविस्मरणीय होती. येथील वन विश्राम गृह देखील छान आहे. अर्धा दिवस निसर्गाचे हे रूप पाहताना कसा गेला हे समझले पण नाही.

आम्ही जड अंतकरणाने परतीचा प्रवास सुरु केले. वाटे मध्ये आम्ही अचलपूर चा सुंदर भुईकोट किल्ला आणि जवळच असलेला ‘हौद कटोरा’ ही वास्तू अनुभवली. पुढे परतवाडायला छान जेवण करुन संध्याकाळी अमरावती चे आंबा माता आणि एकविरा देवीचे दर्शन घेतले. अमरावती मध्ये राहणारे आमचे स्टेट बँकेचे रिटायर्ड ऑफिसर, पोयनाड शाखेचे माजी ब्रांच मॅनेजर आणि माझे सिनियर मोहन कपूर सरांची त्यांचा घरी भेट घेतली. घरातील गणपतीचे दर्शन घेतले आणि चविष्ट जेवण करून परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो.

ह्या सर्व ट्रिप चे नियोजन, ‘चिखलदरा क्लब’ चे को फॉउंडर श्री. भूषण कनकेनवार ह्यांनी केले. चिखलदरा मध्ये पर्यटन वाढवे, तिथे स्थानिकांना रोजगार मिळावा हेच उद्दिष्ट ठेवून ते पर्यटकासाठी अल्प किंमतीमध्ये राहण्याची आणि फिरण्यासाठी ट्रिप चे आयोजन करत असतात. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 74983 83345. सरांचे नियोजन खूपच छान होते, कोणतीही अडचण आम्हाला जाणवली नाही आणि आमची ही ट्रिप अविस्मरणीय केली.

chikhaldara hotel booking

मेळघाट ची भटकंती ही आमच्या आत्तापर्यंत केलेल्या भटकंती मधील एक सुंदर भटकंती होती. विदर्भातील ऑफबीट आणि कमी गर्दीच्या, तितक्याच निसर्गाने भर भरून दिलेल्या मॅजिकल मेळघाट आणि चिखलदऱ्या ला एकदा तरी नक्की भेट दिली पाहिजे..!!

About the Author : Sh. Vaibhav Lokhande

Myself Vaibhav Lokhande, staying at Panvel, Dist. Raigad working as a Dy. Manager at State Bank of India. I like travelling and exploring offbeat places of Sahyadri , wildlife, heritage buildings, temple, step well and specially Forts in Sahyadri. I have visited around 250+ forts of Maharashtra and many more planning to explore in future. I usually travel with solo, with my family and trek friends.

I utilize my weekly holidays for exploring Sahyadri by balancing my office work and family, society responsibility.
My dream is first to explore 396 official forts of Maharashtra and after that remaining forts of India.

Facebook Profile of Author

Frequently Asked Questions
Why Chikhaldara is famous ?

Chikhaldara is famous for its beautiful hills and cool climate. It has scenic views, lush forests, and waterfalls. It’s also known for wildlife, like tigers and leopards. People visit for nature walks and adventure. Plus, it has rich history and culture.

What is right time to visit Chikhaldara ?

The best time to visit Chikhaldara is from October to February. The weather is cool and pleasant then. It’s great for sightseeing and outdoor activities. The monsoon season, from June to September, also brings lush greenery, but it can be rainy.

What is Special feature of Chikhaldara ?

A special feature of Chikhaldara is its unique location in the Melghat range, which is the only hill station in Maharashtra. It offers stunning viewpoints, like the famous Bhimkund. The area is also known for its rich wildlife and the historic Gond temples. Additionally, it’s a great spot for adventure activities like trekking.

How many days are sufficient for Chikhaldara ?

2 to 3 days are enough for Chikhaldara. You can see the main sights and enjoy the nature in that time.

Which is nearest railway station to Chikhaldara ?

The nearest railway station to Chikhaldara is Amravati Railway Station, about 100 km away.

Is Chikhaldara Skywalk Ready?

No, the Chikhaldara Skywalk is still under construction. It is not ready yet for visitors.

What is the price of car from Amravati to Chikhaldara?

The price of a car from Amravati to Chikhaldara typically ranges from ₹2,000 to ₹3,500, depending on the type of vehicle and season. It’s best to check with us by calling Chikhaldara Club on 7498383345.

How is the weather in Chikhaldara in summer?

In summer, Chikhaldara has a pleasant climate. Temperatures range from 20°C to 30°C. It’s generally cool in the mornings and evenings, making it a great time to visit.

How many tigers are there in Chikhaldara?

Chikhaldara is part of the Melghat Tiger Reserve, which is home to around 40 to 45 tigers. However, spotting them can be rare due to the dense forest.

Chikhaldara Hill Station Places to Visit | Chikhaldara Hill Station Resorts | Chikhaldara Hill Station Information | Chikhaldara Hill Station Best Time to Visit | Chikhaldara Hill Station Photos | Chikhaldara Hill Station Photos | Chikhaldara Hill Station near Nagpur

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *